निलांजना चक्रवर्ती
बांधकाम करण्यासाठी उपयुक्त साहित्याच्या किमती सध्या घसरल्या आहेत आणि मजुरांची मुबलक प्रमाणावर उपलब्धता आहे. तुम्ही नवीन घर बांधण्याचा किंवा आहे त्या घरात बदल करण्याचा विचार करीत असाल, तर सध्याचा काळ तुमच्यासाठी अतिशय अनुकूल आहे.
आपले स्वतःचे हक्काचे घर असावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. एका अहवालाअनुसार सध्या देशात २.४५ लाख घरे बांधून तयार आहेत. मात्र, ग्राहकांअभावी ती अद्याप तशीच पडून आहेत. मालमत्तांच्या किमतींत अद्याप 'करेक्शन' न आल्यामुळे गृहबांधणी उद्योगात सध्या अस्थिरतेचे आणि निराशेचे वातावरण आहे. त्यातच भरीस भर म्हणून नुकत्याच जाहीर झालेल्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेतर्फे व्याजदरात घटही करण्यात आलेली नाही. याशिवाय वस्तूंचे ('कमोडिटीज') भावही घसरलेले आहेत.
या सर्व बाबींचा एकत्रित विचार केला असता, एक बाब लक्षात येते आणि ती म्हणजे घर बांधण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ आहे. घरबांधणीसाठी आवश्यक वस्तू आणि कच्च्या मालाच्या किमतींत जवळपास ४७ टक्क्यांची घट झाली आहे. त्यामुळे गेल्या सहा तिमाहींमध्ये घरउभारणी किमतीमध्येही ६ ते २१ टक्क्यांची घट झाल्याचे दिसून आले आहे. घरबांधणीच्या खर्चावर परिणाम करणारा सर्वांत प्रभावी घटक म्हणून पोलादाकडे पाहिले जाते. देशातील पोलादनिर्मिती उद्योगाचे संरक्षण करण्यासाठी गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारने आयात करण्यात येणाऱ्या पोलादावर किमान आयातशुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. एप्रिल २०१४ ते सप्टेंबर २०१५ या कालाधीत पोलादाच्या किमतीत सरासरी १८ टक्के घट झाली. घरबांधणीसाठी स्टीलनंतर सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे सिमेंट होय. गेल्या काही महिन्यांमध्ये सिमेंटच्या किमतींत अल्पशी का होईना वाढ झाली. मात्र, सध्या सिमेंटचे दर एप्रिल २०१४च्या किंमतपातळीपेक्षा पाच टक्क्यांनी खालीच आहेत. या शिवाय विटा, रंग, इलेक्ट्रिकल फिटिंग आणि 'सॅनिटरी'शी संबंधित सर्वच वस्तूंचे दर खाली आले आहेत.
एकीकडे घरबांधणीसाठी उपयुक्त वस्तूंच्या किमतीमध्ये घट होत असताना बांधणी सर्वस्वी ज्यांच्यावर अवलंबून आहे, त्या मजुरांची मजुरी, 'आर्किटेक्चर'ची फी आणि अन्य किरकोळ खर्चांमध्ये मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे. राजधानी दिल्ली आणि देशभरातील अन्य भागांमध्ये वाळू उत्खननावर निर्बंध लागू झाल्यामुळे वाळूच्या भावांतही वाढ पहायला मिळाली आहे. रिअल इस्टेट क्षेत्रात सध्या मंदीचे वारे वाहात आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील नव्या प्रकल्पांची संख्या गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत बरीचशी घटली आहे. त्यामुळे कामगारांच्या हाताला सध्या तरी मोठ्या प्रमाणात काम उपलब्ध नाही, अशीच परिस्थिती आहे. याचाच अर्थ कारागीर, मजूर आणि घरबांधणीसाठी उपयुक्त वस्तू सहजरित्या उपलब्ध होत आहेत. या पार्श्वभूमीवर जर तुम्ह घर बांधण्यासाठी आधीच जागा शोधली असेल आणि सर्व परवानग्या मिळवल्या असतील, तर वाट कसली पाहताय..सध्याच्या अनुकूल परिस्थितीचा लाभ उठवून घरबांधणीसाठी सज्ज व्हा.
त्यामुळे घरबांधणीची इच्छा असणाऱ्यांनी वेळ न दवडता आलेल्या संधीचा लाभ घेण्यास हरकत नाही. तसे पाहता बिल्डरच्या भरवशावर न राहता स्वतःचे घर स्वतःहून बांधणे, अनेकांसाठी अवघड बाब असते. मात्र, स्वतःच स्वतःचे घर बांधणे हा एक व्यवहारिक पर्याय ठरू शकतो. मात्र, सद्य परिस्थितीत घरबांधणीची हाती आलेली संधी दवडणे, ही एक घोडचूकच ठरेल. आमच्या अंदाजानुसार सध्या घरबांधणीसाठी ३० लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, सद्य परिस्थितीत हा खर्च १.९ लाख रुपयांनी घटण्याची शक्यता आहे. लक्षात घ्या.. घरबांधणीचे नियोजन करताना बराच वेळ खर्च होण्याची शक्यता असते. स्थानिक स्वराज्य संस्थेकडून सर्व परवानग्या मिळेपर्यंत बराचसा अवधी निघून जातो. घराची अपेक्षित रचना आणि कर्जपुरवठा यांच्यातही वेळ जातो. त्यामुळे दोन ते अडीच महिन्यांनंतर घरबांधणीचे नियोजन करणार असाल, तर आतापासूनच सवड काढण्यास हरकत नाही.
मोठ्या प्रमाणावर वस्तूखरेदी टाळा
घरबांधणीसाठी आवश्यक वस्तूंच्या किमती उतरल्या असल्या, तरी या संधीचा लाभ घेताना काही पथ्ये पाळण्याची आवश्यकता आहे. घरबांधणीसाठी आवश्यक वस्तू सहज उपलब्ध होत असल्या तरी, त्या वस्तूंची साठवण ही एक मोठी समस्या आहे. सिमेंट, विटा आणि स्टील यांच्या साठवणुकीत बव्हंशी समस्या निर्माण होत असल्याचे दिसून आले आहे. जरी तुमच्याकडे मोठ्या प्रमाणावर मोकळी जागा असली, तरीदेखील गरजेपुरतेच सिमेंटची साठवण करा. एकाच वेळी मोठ्या प्रमाणात स्टील आणि सिमेंट खरेदी करण्याची गडबड करू नका. गरजेप्रमाणेच वस्तूंची खरेदी करून त्याचा उपयोग करा. बांधकाम साहित्याचा विचार करता सर्वच साहित्य एकाचवेळी मागविण्याची आवश्यकता नाही. रंग, इलेक्ट्रिक उपकरणे आणि टाइल्स यांच्या किमती अगोदरच उतरल्याने या वस्तू बांधकाम अखेरच्या टप्प्यात आले असताना आणल्या तरी चालतात.
(महत्त्वाची सूचना : घरबांधणीसाठी उपयुक्त वस्तूंच्या किमती एप्रिल २०१४ ते सप्टेंबर २०१५ या कालावधीतील असून, दिल्लीतील बुरारी मार्केटमधील आहेत. )
Source

No comments:
Post a Comment