Wednesday, 6 January 2016

Mumbai Housing prices fall by 20 per cent indicated मुंबईत घरांच्या किमती 20 टक्क्यांनी घसरण्याचे संकेत

मुंबई : जर तुम्ही मुंबईत नवीन घर घेण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. येत्या काळात मुंबईतील घरांच्या किमती 20 टक्क्यांनी घसरण्याची शक्यता आहे. नव्या बांधकामासाठी लागणाऱ्या परवानग्यांची संख्या कमी करण्यात आल्यामुळे दर घटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जलद गतीने मिळणाऱ्या परवानग्या आणि परवानग्यांचा आकडा 119 वरुन 58 वर आणल्याने 20 टक्क्यांपर्यंतची घसघशीत सूट गृहखरेदीदारांना मिळू शकते, असा दावा काही बिल्डर करत आहेत. बांधकामाचं एकूण बजेट 30 टक्क्यांनी कमी होणार असल्याने नफा धरुन ग्राहकांना 20 टक्के सूट देता येऊ शकते, असं रिअल इस्टेट क्षेत्रातील जाणकार मानतात.
बीएमसीमध्ये परवानग्यांसाठी बिल्डर प्रति स्क्वेअर फूटमागे एक हजार रुपये खर्च करतात, असं एका वरिष्ठ आर्किटेक्टने सांगितलं आहे. मात्र परवानग्यांचे आकडे निम्म्यावर आल्याने हा खर्च प्रति स्क्वेअर फूट 700 ते 800 रुपयांवर येऊ शकतो, असं म्हटलं जातं. त्यामुळे याचा थेट फायदा गृहखरेदीदारांना होणार आहे.

Source

No comments:

Post a Comment